निर्मिती

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

उत्पत्ती १:१-२:३

१ प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. २ आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. ३ तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. ४ देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. ५ देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. ६ मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.” ७ असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले. ८ देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. ९ मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले. १० देवाने कोरड्या जमिनीला ‘भूमी’ म्हटले व जलांच्या संचयाला ‘समुद्र’ म्हटले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. ११ तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले. १२ हिरवळ, आपापल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली; देवाने पाहिले की हे चांगले आहे. १३ आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस. १४ मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्‍या होवोत; १५ पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले. १६ देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले. १७⁻१८ पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे. १९ आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस. २० मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.” २१ प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. २२ देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” २३ आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस. २४ मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले. २५ असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. २६ मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” २७ देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. २८ देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.” २९ देव म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो; ही तुमचे अन्न होतील. ३० त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी ह्यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो.” आणि तसे झाले. ३१ आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस. १ ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्वकाही सिद्ध झाले. २ देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. ३ देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00