पहिलं पाप

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
पुढील कथा सुरू करण्यापूर्वी, आपण गेल्या आठवड्यात शिकलेल्या कथेवर संभाषण करूया.
आपण ती कथा कशा प्रकारे पाळली किंवा आपल्या जीवनात ती कशी लागू केली?
आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक केली? आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

उत्पत्ती ३:१-२४

१ परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?” २ स्त्रीने सर्पाला म्हटले, “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे: ३ पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.” ४ सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही; ५ कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” ६ त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. ७ तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि ‘आपण नग्न आहोत’ असे त्यांना कळून आले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. ८ ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. ९ तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” १० तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” ११ देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?” १२ आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” १३ परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” १४ तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, “तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील; १५ आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.” १६ तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” १७ आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; १८ ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील; १९ तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” २० आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. २१ परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री ह्यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. २२ मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;” २३ ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. २४ देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00