९ तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस.
१० आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,
११ वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.
१२ कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.
१३ तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग.
१४ ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुनमुहूर्त पाहणार्यांचे आणि चेटूक करणार्यांचे ऐकणारी आहेत; पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.