चर्च उपक्रम

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
पुढील कथा सुरू करण्यापूर्वी, आपण गेल्या आठवड्यात शिकलेल्या कथेवर संभाषण करूया.
आपण ती कथा कशा प्रकारे पाळली किंवा आपल्या जीवनात ती कशी लागू केली?
आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक केली? आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

प्रेषितांची कृत्ये २:१-५

१ नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. २ तेव्हा अकस्मात मोठ्या वार्‍याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ३ आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. ४ तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. ५ त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते.

प्रेषितांची कृत्ये २:१४

१४ तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.

प्रेषितांची कृत्ये २:३६-४७

३६ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” ३७ हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” ३८ पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. ३९ कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.” ४० आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” ४१ तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ४२ ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ४३ तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. ४४ तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ४५ ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ४६ ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. ४७ सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00