१९ हे देवा, तुझे नीतिमत्त्व गगनापर्यंत पोहचले आहे. हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत; तुझ्यासारखा कोण आहे?
२० तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
२१ तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.
२२ मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन.
२३ मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.
२४ माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.