२७ मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”
२८ तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.”
२९ तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”
३० तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
३१ तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.
३२ मग ते तेथून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले.
३३ त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
३४ परंतु परूशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.