बाप्तिस्मा देणारा योहान

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
पुढील कथा सुरू करण्यापूर्वी, आपण गेल्या आठवड्यात शिकलेल्या कथेवर संभाषण करूया.
आपण ती कथा कशा प्रकारे पाळली किंवा आपल्या जीवनात ती कशी लागू केली?
आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक केली? आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

मत्तय ११:१-१९

१ मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला. २ योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, ३ “जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” ४ येशूने त्यांना उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; ५ ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’; ६ जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.” ७ ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय? ८ तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. ९ तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. १० ‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. ११ मी तुम्हांला खचीत सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. १२ बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. १३ कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले; १४ आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे. १५ ज्याला कान आहेत तो ऐको. १६ ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, १७ ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत,’ त्यांच्यासारखी ही पिढी आहे. १८ कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात. १९ मनुष्याचा पुत्र खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.”

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00