२२ नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले.
२३ मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.
२४ इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्यापासून बर्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते.
२५ तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला.
२६ शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले.
२७ परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
२८ तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”
२९ त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला;
३० परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.”
३१ येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
३२ मग ते तारवात चढल्यावर वारा पडला.
३३ तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”
३४ नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले.
३५ आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले;
३६ आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.