परूशी लोकांचा न्याय

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
पुढील कथा सुरू करण्यापूर्वी, आपण गेल्या आठवड्यात शिकलेल्या कथेवर संभाषण करूया.
आपण ती कथा कशा प्रकारे पाळली किंवा आपल्या जीवनात ती कशी लागू केली?
आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक केली? आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

मत्तय २३:१६-३९

१६ अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो.’ १७ अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? १८ तुम्ही म्हणता, ‘कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’ १९ अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? २० म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो; २१ आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्‍याची शपथ घेतो; २२ आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्‍याची शपथ घेतो. २३ अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. २४ अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता! २५ अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. २६ अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. २७ अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. २८ तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. २९ अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता; ३० आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ ३१ ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्‍यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता. ३२ तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. ३३ अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? ३४ म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल; ३५ ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा. ३६ मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील. ३७ यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! ३८ पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’ ३९ मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.”

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00