तीन नोकरांना सोपवले

संगती

देवाचे शोधायच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपले जीवन कसे चालू आहे हे जाणून प्रारंभ करूया. मागील आठवड्यात आपण किंवा आपल्या समुदया मध्ये देवाने असे काही केले आहे का ज्यामुळे आपण देवाचे आभार मानू इच्छिता?
पुढील कथा सुरू करण्यापूर्वी, आपण गेल्या आठवड्यात शिकलेल्या कथेवर संभाषण करूया.
आपण ती कथा कशा प्रकारे पाळली किंवा आपल्या जीवनात ती कशी लागू केली?
आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक केली? आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
आता, आपण देवाकडून नवीन कथा ऐकू या.

मत्तय २५:१४-३०

१४ कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्‍या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. १५ एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला. १६ ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले. १७ तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले. १८ परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. १९ मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. २० तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’ २१ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ २२ मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’ २३ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ २४ नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; २५ म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ २६ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? २७ तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. २८ तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. २९ कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल; ३० आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’

Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.

अर्ज

आता पुन्हा कथा ऐकू या.
या कथेतून आपण देवाबद्दल काय शिकलात?
या कथेतून आपण स्वतःसह लोकांबद्दल काय शिकता?
आपण आपल्या जीवनात ही कथा कशी लागू कराल? अशी कोणती आज्ञा आहे की जी पाळली पाहिजे? अनुसरण करण्यासाठी कुठलं उदाहरण ? किंवा स्वतःहून काढून टाकण्याची गरज आहे असे कोणते पाप?
सत्य स्वतःपर्यंत साठवले जाऊ नये, कोणीतरी आपल्याला सत्य कळविले, ज्याचा आपल्याला फायदा झाला तर, येत्या आठवड्यात आपण ही कथा कोणाबरोबर सामायिक कराल?
आपण या सत्राच्या शेवटच्या टप्यात असताना, पुढच्या आठवड्यात आपण कधी भेटू ते ठरवू, आणि पुढील सत्राची सुविधा कोण करेल ते ठरवू.
एकत्र हा चांगला वेळ राहिला. आम्ही आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपण काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या, आणि पुढच्या सत्रात येण्यापूर्वी कथा वाचा.

0:00

0:00